आभार संस्था संचलित, माऊली महिला नमन मंडळ यांचा स्तृत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या संस्थेने महाराष्ट्रातील पहिले कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या नमन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन शनिवार दिनांक 25 /10/2025 रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सादर होणार आहे. Women Naman will be presented at Chiplun

केवळ महिलांनी चूल आणि मुल न सांभाळता पुरुषाच्या बरोबरीने काम करायलाच हवे आणि म्हणूनच या मंडळाने कोकणची नमन कला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न सफल होताना दिसत आहे. वय वर्षे 15 ते 72 वयोगटातील या महिला कलाकारांनी सादर केलेले नमन हे एक शिवधनुष्य उचलल्या सारखेच आहे. आता या नमन मडळाचा कार्यक्रम शनिवार दि 25/10/25 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केद्र चिपळूण येथे होणार आहे. Women Naman will be presented at Chiplun
लेखक दिग्दर्शक नमनसम्राट श्री. यशवंत वाकडे, निर्माता श्री. साईनाथ नागवेकर, आभारचे अध्यक्ष श्री. विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य श्री. दादा वाडेकर, श्री. शरदजी गोळपर, श्री. मदन डोर्लेकर, ( गुरूजी) श्री. वसंत घडशी, सुत्रधार श्री. वासुदेव वाघे, श्री सागर मायगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सौ. सर्वता चव्हाण यांनी लिहलेली असून मुख्य गायिका सौ.आकांक्षा वायंगणकर, सौ. सर्वता चव्हाण, सौ. वेदा शेट्ये या गीते गात आहेत. यामध्ये कलाकार सौ. प्रेरणा विलणकर, श्रीमती. ज्योती कदम, सौ. रेश्मा शिंदे, सौ.पूनम गोळपकर, सौ.अर्चना मयेकर, श्रीमती. रेखा खातू, सौ.विनया काळप, कु.मनस्वी साळवी, सौ. सर्वता चव्हाण, सौ.रिमा देसाई, सौ. गीता भागवत, कु.पूर्वा चव्हाण, सौ.समिक्षा वालम, सौ. आकाक्षा वायंगणकर, सौ.तन्वी नागवेकर, सौ.शीतल सकपाळ, कु. जुई पावसकर, कु.शोभना वरवटकर, कु. शमिका विलणकर, सौ. वेदा प्रकाश शेट्ये, श्रीमती. माधवी पाटील, कु. स्वीटी पावसकर, कु. निधी वरवटकर या भूमिका करत आहेत. तर नेपथ्य रचना श्री.बावा आग्रे ( लांजा)हे सांभाळत आहेत. Women Naman will be presented at Chiplun

तरी चिपळूण येथील हा महिलांनी सादर करीत असलेला नमनाचा कार्यक्रम आवर्जून पहावा व या सर्व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे रसिक श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. Women Naman will be presented at Chiplun