सुशांतभाई सकपाळ
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका महायुती म्हणून लढवण्यात याव्यात. या निवडणुकात मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला सोबत घेऊन सत्तेत सहभागी करून घेतल्यास आंम्हाला खात्री आहे की, खेडचा सभापती हा महायुतीचाच असेल, महायुती म्हणूनच निवडणुका या पूर्ण ताकदी निशी लढणार आहोत. खेड तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या राजकीय पक्षाचा निर्धार सरचिटणीस सुशांतभाई सकपाळ यांनी माहिती दिली. Mahayuti will contest the elections with full force
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या राजकीय पक्षाची रत्नागिरी जिल्ह्याची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जिल्हा पदाधिकारी, तालुका व शहर पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष प्रकाशजी मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य बाबासाहेब मर्चंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. Mahayuti will contest the elections with full force

यावेळी खेड तालुका अध्यक्षपदी गौतम तांबे, सरचिटणीसपदी जितेंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठींची पूर्वतयारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक बाबत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक तालुक्यात नव्या तरुण युवा वर्गाला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच “गाव तिथे शाखा” अभियान जिल्ह्यात राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होणे ताकतीने लढवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच महायुतीने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणावेत. खेड तालुक्यात महायुती म्हणून निवडणुका लढावी व लोटे पंचायत समिती, बहिरवली गण रिपब्लिकन पक्षाला सोडावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. Mahayuti will contest the elections with full force

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम तांबे, जिल्हा पर्यावरण अध्यक्ष तांबे, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, दापोली तालुका अध्यक्ष राहुल जाधव, खेड युवक अध्यक्ष विकास धोत्रे, किरण गमरे,गुहागर तालुका युवा अध्यक्ष विजय असगोलकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा युवक संपर्कप्रमुख गणेश शिर्के, खेड शहर अध्यक्ष दीपेंद्र जाधव,, मिलिंद तांबे संतोष कापसे, चंद्रमणी रुके आदी. जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते. Mahayuti will contest the elections with full force