मंदार कचरेकर (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहर)
गुहागर, ता. 20 : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी गुहागर येथे बैठक घेऊन पक्ष संघटना आणि येणार्या निवडणुका याविषयी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजेच कार्यकर्त्याच्या निवडणुकीत ताकतीने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहिला, असा विश्वास जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी दिला. NCP’s preparation to contest the Nagar Panchayat on its own

गुहागर नगरपंचायत निवडणूक महायुती म्हणुन लढण्याची इच्छा आहेच, परंतु महायुती मध्ये जागा वाटप योग्य पद्धतीने झाले नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागेवर उमेदवार उभे करणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निरीक्षक समिती कडून नगरपंचायत च्या 17 प्रभागांमध्ये सक्षम उमेदवारांची चाचपणी सुद्धा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी नगरसेविका सौ. सुजाता बागकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहर कार्यकारिणी मीटिंग मध्ये एकमताने जाहीर झाले आहे. NCP’s preparation to contest the Nagar Panchayat on its own
