गुहागर, ता. 13 : तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, मुंबई ( काजुर्ली ) यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त यांचा सत्कार समारंभ नाडकर्णी पार्क वडाळा येथे राजेंद्र यशवंत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शैलेंद्र मोहिते हे प्रमुख मार्गदर्शक आणि बौद्धाचार्य प्रमोद मोहिते हे उपस्थित होते. Student honors by Dr. Babasaheb Ambedkar Manch

धम्मसंस्कार विधीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व धम्म उपासक, उपासिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते. इ.१० वी मध्ये उत्तीर्ण झालेले निखिल प्र.मोहिते, ईशा मोहिते, अथर्व मोहिते, भावेश मोहिते, सांची मोहिते तसेच १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेले प्रफुल्ल सं.मोहिते, प्रेरणा मोहिते, श्रावणी मोहिते, प्रांजल मोहिते, तसेच पदवीधर मध्ये अदिती मोहिते, प्रबुद्धी मोहिते,रोशनी मोहिते, प्रफुल्ल दि.मोहिते, प्रगती मोहिते, साक्षी मोहिते (MBA), या सर्व गुणवंतांचा बॅग आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. Student honors by Dr. Babasaheb Ambedkar Manch
यावेळी सेवानिवृत्ती झालेले अमोल मोहिते, प्रमोद मोहिते, अरुण मोहिते, विजय मोहिते, संतोष मोहिते, विश्वास मोहिते हे उपस्थित होते. त्यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे, समाजाचे, देशाचे नाव उंचवावे.आणि आपला सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक शैलेंद्र मोहिते यांनी केले. Student honors by Dr. Babasaheb Ambedkar Manch

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक सिताराम मोहिते, गणपत मोहिते, सखाराम मोहिते, गंगाराम मोहिते, दत्ताराम पवार, प्रदीप मोहिते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच,मुंबई चे सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजेंद्र पवार आणि अमरनाथ मोहिते यांनी केले. Student honors by Dr. Babasaheb Ambedkar Manch