• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पंचायत समितीच्या १० गणाचे आरक्षण जाहीर

by Ganesh Dhanawade
October 13, 2025
in Old News
152 2
0
Guhagar Panchayat Samiti Reservation
299
SHARES
854
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम गुहागर पंचायत समिती सभागृह येथे पार पडला. या पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या देखरेखीखाली तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. Guhagar Panchayat Samiti Reservation

यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जीवन शिक्षण शाळा नं. 1 चा विद्यार्थी श्लोक वैभव तुलसूणकर याच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीमध्ये पाचेरीसडा पंचायत समिती गण मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शृंगारतळी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, मळण पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, शीर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, असगोली पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, अंजनवेल पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, कोंड कारूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण अनारक्षित, पडवे पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, तळवली पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, वेळणेश्वर पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण  असे आरक्षण पडले आहे. Guhagar Panchayat Samiti Reservation

Guhagar Panchayat Samiti Reservation

दरम्यान, अनेक पंचायत समिती गणांमध्ये मध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले आहे. तर काही पंचायत समिती गणमध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आतापासूनच महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. असगोली व अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षाना महिलांची शोधाशोध करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी सदस्य पदांसाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल, अशी ही स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारण अनारक्षित पडलेल्या कोंड कारूळ, पडवे, तळवळी, वेळणेश्वर चारी गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार हे निश्चित आहे. Guhagar Panchayat Samiti Reservation

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar Panchayat Samiti ReservationLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.