गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायत आरक्षण जाहीर झाले असून आगामी निवडणुकीत गुहागर नगरपंचायत च्या सर्व जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी देणार असून इच्छुक युवकांनी उमेदवारीसाठी पुढे यावे, असे आव्हान गुहागर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी केले आहे. Guhagar Nagar Panchayat Reservation

नुकतेच गुहागर नगरपंचायत मधील 17 प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून इच्छुकही आपली बरणी लागण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरुवात केली आहे. नगर पंचायत आगामी असणारी नवीन नगरसेवक हे सर्व नवीन चेहरे असावेत यासाठी प्रयत्न सुरू केले असून जे युवक या निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनीही संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. Guhagar Nagar Panchayat Reservation
नवीन चेहऱ्यांना संधी देताना मात्र गुहागरचा विकास हा एकच ध्यास अशी मानसिकता असणाऱ्या नवतरुणांना संधी देणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची ही माहिती साहिल आरेकर यांनी दिली. Guhagar Nagar Panchayat Reservation