भारत शिक्षण मंडळ करतेय वैचारिक संस्कार – सदानंद भागवत
रत्नागिरी, ता. 12 : कोकणात भारत शिक्षण मंडळासारख्या संस्था १०० वर्षांपासून शुद्धतेने काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लौकिक देशात आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत सर्वाधिक भारतरत्न दिले आहेत. शाळांमधून चांगले संस्कार केल्यामुळेच वीज चोरी, दंगली, खोटी पटसंख्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत नाही. आज वैचारिक व राष्ट्रभक्तीचे संस्कार शैक्षणिक संस्थांमधून होण्याची गरज आहे. आताची शाळेत शिकणारी मुलेच २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकारतील, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले. Inauguration of Bharat Shikshan Mandal building

भारत शिक्षण मंडळाच्या बालवाडी, प्राथमिक व गुरुकुलच्या प्रशस्त इमारतीचे उद्घाटन आणि देणगीदारांचा सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी मंचावर भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर, उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि भारत शिक्षण मंडळाचे देणगीदार आणि उद्योजक शिवनाथ बियाणी (जयसिंगपूर) उपस्थित होते. देणगीदारांचा सन्मान शाळा, श्रीफळ, नारळापासून बनवलेले सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. Inauguration of Bharat Shikshan Mandal building
सुरवातीला सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि डिजिटल माध्यमाद्वारे कळ दाबून इमारतीचे उद्घाटन सदानंद भागवत यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांचा वैचारिक विकास व्हायला हवा, असे सकारात्मक ब्रेन वॉशिंग करायला हवे. अशा प्रसंगी भारत शिक्षण मंडळाची जबाबदारी अधिक वाढते. आजपर्यंत या संस्थेने असे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. तशाच प्रकारे विकसित भारतात योगदान देणाऱ्यांची पिढी म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे, असेही आवाहन सदानंद भागवत यांनी केले. Inauguration of Bharat Shikshan Mandal building

अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी सांगितले की, मी या शाळेत शिकलो. शिष्यवृत्ती व समाजाच्या मदतीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकलो त्यामुळे मी सेवानिवृत्तीनंतर शाळेच्या कामात झोकून दिले. २००१ पासून मी काम करत आहे. मुंबई महापालिकेत ३६ वर्षे अभियंता म्हणून नोकरी केली. महापालिका आणि भारत शिक्षण मंडळात मला बरेच शिकायला मिळाले. ही इमारत पूर्ण व्हावी, असे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. देणगीदार, पालक, शिक्षक यांचेही योगदान मिळाले आहे. बालवाडी ते वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या मोजक्याच संस्था असून त्यात आपली संस्था असल्याचे सांगितले. Inauguration of Bharat Shikshan Mandal building
नव्या इमारतीमध्ये यंदा जूनपासून वर्ग सुरू झाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही इमारत अद्ययावत रितीने बांधली आहे. यामध्ये सौ. गोदावरीदेवी भ. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघर, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर व गुरुवर्य रा. पु. जोग संजीवन गुरुकुलचे वर्ग भरतात. या इमारतीमध्ये ३४ खोल्या, ३ सभागृह असून प्रशस्त, मोकळी, हवेशीर इमारत आहे. शाळेला १२३ वर्षांची परंपरा आहे. ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ए. व्ही. रूम आहे. याप्रसंगी डॉ. परकार यांनीही अध्यक्ष नंदकुमार साळवी यांचे भरीव योगदान, जातीनिशी लक्ष ठेवल्यामुळे अल्प कालावधीत ही इमारत पूर्णत्वास गेल्याचे सांगितले. Inauguration of Bharat Shikshan Mandal building

कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, ही इमारत बांधण्याकरिता देणगीदारांकडून भरीव मदत मिळाली. त्याकरिता कार्यकारिणीतील सर्वांनी योगदान दिले आहे. आज देणगीदारांचा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. शाळेची प्रगती चौफेर सुरू आहे. नव्या इमारतीमुळे त्यात अधिक भर पडेल. पाहुण्यांचा परिचय कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी करून दिला. सूत्रसंचालन सौ. मंजिरी गुणे यांनी केले. आगाशे विद्यामंदिरचे प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी आभार मानले. Inauguration of Bharat Shikshan Mandal building