गुहागर, ता. 10 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील तृतीय व चतुर्थ वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली विचारशैली आणि वक्तृत्वकला प्रदर्शित केली. Debate competition at Maharshi Parashuram College

या स्पर्धेत कु. तनुजा आंबेकर (चतुर्थ वर्ष – विद्युत अभियांत्रिकी) हिने प्रथम क्रमांक, कु. शंतनू गुरव (तृतीय वर्ष – संगणक अभियांत्रिकी) याने द्वितीय क्रमांक, तर कु. यश पेडणेकर (तृतीय वर्ष – यांत्रिक अभियांत्रिकी) याने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षक श्री. सतीश घोरपडे (विभाग प्रमुख – विद्युत अभियांत्रिकी) आणि डॉ. गणेश दिवे (विभाग प्रमुख – प्रथम वर्ष विभाग) यांनी काम पाहिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Debate competition at Maharshi Parashuram College

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अविनाश पवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे श्री हृषिकेश भावे आणि टीम यांनी विशेष प्रयत्न केले. Debate competition at Maharshi Parashuram College