गुहागर, ता. 08 : कोकणातील नाच म्हटल्यावर सगळ्यांचेच पाय ठिबकतात. याचाच प्रत्यय गुहागर कीर्तन वाडी येथे राहणारी सहा वर्षाची नेपाळी नबीना हीने कोकणातील असलेल्या सांस्कृतिक नाचावर आपले प्रभुत्व गाजवले असून तिचा नाच बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. Nabina’s dance viral in Guhagar
गुहागरात एका खाजगी बालवाडीत शिकणारी सहा वर्षीय नेपाळी मुलगी नबीना भीमराज वनटंकी हिला नाचाची फारच आवड आहे. सध्या ती गुहागर कीर्तन वाडी येथे राहत असून गणपतीचे नाच, दसऱ्यातला गरबा, गोप नृत्य अथवा जाकडी नृत्य असो या नाचामध्ये ती आवर्जून सहभाग घेत असते. या नाचामध्ये तिने आता एवढे प्राविण्य मिळवले आहे की, त्या वाडीतील प्रत्येक नाचामध्ये तिला आवर्जून बोलावलं जातं. ते पण लहान मुलांचे नाही तो मोठ्यांच्या नाचांमध्ये तिचा सहभाग असतो. या नाचाच तिने कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही. बाजूला बसूनच नाच बघून सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. Nabina’s dance viral in Guhagar

नवीन चे वडील गुहागरतील एका चायनीज सेंटर मध्ये आचारी म्हणून आहेत. नबीनाच्या शिक्षणासाठी त्यांनी गुहागरतील एका नर्सरीमध्ये तिचा प्रवेशही घेतलेला आहे. नवीन अभ्यासातही तसेच इथल्या संस्कृतीची ओढ असल्याचे त्यांनी सांगितले ती राहत असलेल्या किर्तन वाडी येथील परिसरातील लोकांना सुद्धा तिची एवढी ओढ लागली आहे की, सर्वजण तिला आपल्या घरी बोलवत असतात तिचे नेपाळी भाषेबरोबरच मराठी भाषेवरही चांगलेच प्रभुत्व आहे. तिचे नाचाचे व्हिडिओ सध्या गुहागरात व्हायरल होत आहेत. Nabina’s dance viral in Guhagar