• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

by Manoj Bavdhankar
October 6, 2025
in Old News
80 0
0
Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath
156
SHARES
447
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व अॅनिमीया मुक्त अभियान” नुकतेच उमराठ येथील श्री नवलाई देवीची सहाण येथे मोठय़ा उत्साहात संपन्न झाले. या अभियानाचे उद्घाटन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

यानंतर उमराठ आरोग्य उपकेंद्राच्यावतीने  उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. सदर अभियानाची प्रस्तावना व मुख्य उद्देश सांगून राधा आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सुद्धा सुंदर रांगोळी काढणाऱ्या कलाकारांचे तसेच उत्तम आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहारात परिपूर्ण अन्न ताट व आहारात दिल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचे स्वत: बनवून उत्तमरीत्या प्रदर्शन भरविणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका यांचे कौतुक आणि अभिनंदन करून उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

सदर अभियानात रक्तदाब व मधुमेह तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसुती पूर्व करण्यात येणाऱ्या तपासण्या, लस्सीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबीन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिक्लेस आजार व रक्तक्षय तपासणी, डोळे व दात तपासणी,  वजन व उंची तपासणी, आयुष्यमान भारत कार्ड KYC करणे तसेच आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड KYC करणे इत्यादी तपासण्या व KYC करण्यात आल्या. Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

या अभियानात उमराठ व उमराठ खुर्दच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनवून आणलेल्या पाककला, पाककृती महोत्सवाचे प्रदर्शनही उत्साहात संपन्न झाले. या अभियानात बहुसंख्य महिलांनी, मुलीनी व लहान बालकांनी तसेच पुरुष ग्रामस्थांनी सुद्धा विविध तपासणींचा मोफत लाभ घेतला. सदरचे अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, उमराठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे तसेच ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, साईस दवंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे तसेच शिबीरात सहभागी होऊन विविध तपासणी करून घेतल्या बद्दल उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्व ग्रामस्थांचे कौतुक करून आभारही मानले.  Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

सदर अभियानात डोळे व दंत चिकित्सा करणारे डॉ. जोशी (nab eye hospital team), जनरल तपासणीसाठी तालुका आरोग्य विभागाचे मोबाईल व्हॅन पथकचे डॉ. वैभव तोंडे, फार्मसिस्ट श्री. प्रजोत नरोटे आणि सहकारी, सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे, उमराठ शाळा नं. १ चे मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर, उपशिक्षक नागरगोजे, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी पोलीस पाटील महादेव आंबेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, जेष्ठ नागरिक कुंदन कदम, नामदेव पवार, शशिकांत पवार, पुणाजी गावणंग, देवजी गोरिवले, शांताराम गोरिवले, अशोक जालगावकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, आरोग्य सहाय्यक श्री. दत्तात्रय मुद्दामवार, आरोग्य सहायिका लक्ष्मी बिर्जे मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, प्रशिका थोरात, शीतल खोले, विवेक पाटीदार, आरोग्य सेविका दीपा असगोलकर, अंकिता पालकर, रूपम जाधव, आरोग्य सेवक यदनेश कुलकर्णी, सुनील उंडे, ऋषिकेश पाटील, फ्लेबोटोमिस्ट स्वपन्जा तोडणकर, आशा गट प्रवर्तक साक्षी जाधव, आशा स्वयंसेविका वर्षा गावणंग, रुचिता कदम, पूजा माटल, विजया ढोरलेकर, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, सारिका धनावडे, राधा आंबेकर, अंगणवाडी मदतनीस जिया पवार, मयुरी गोरिवले इत्यादी सहभागी झाले होते. Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSwasth Nari Sakhat Parivar Mission at Umrathटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.