गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेत शारदोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख आकर्षण ठरलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात मनाली वनकर या विजेत्या ठरल्या .तसेच द्वितीय क्रमांक सोनाली भोसले तर तृतीय क्रमांक प्रिया रोहीलकर यांनी संपादन केला. मान्यवरांच्या शुभहस्ते आकर्षक पैठणी देऊन त्यांना गौरविण्यात आले. Home Minister Program at Veldur Navanagar School

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शिल्पाताई कोळथरकर व माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांसाठी खास लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. सदर लकी ड्रॉच्या मानकरी सौ प्रिय वंदा दाभोळकर व भारती रोहीलकर या ठरल्या. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री निलेश पाटील यांनी केले. Home Minister Program at Veldur Navanagar School
त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी टिपरीच्या तालावर दांडिया नृत्य सादर केले. धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना काही क्षण आनंद उपभोगता यावा म्हणून पारंपारिक झिम्मा, फुगडी, विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. सर्व महिलांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. युवा नेते केतन दत्ताराम वनकर यांनी सरस्वती देवीची मूर्ती दिली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश पाटील, मनोज पाटील, मनोज पावस्कर, शंकर कोळथरकर, रमेश तानू रोहीलकर, संदीप वनकर, नारायण रोहीलकर, दत्ताराम रोहीलकर, नरेश रोहिलकर, नवानगर गावचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला यांनी आर्थिक योगदान दिले. Home Minister Program at Veldur Navanagar School

यावेळी शारदा उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज पावस्कर, उपाध्यक्ष रवींद्र जांभारकर, श्रीराम महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा ताई रोहीलकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश रोहीलकर, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सुरक्षा रोहीलकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती आप्पा रोहीलकर, प्राजक्ताताई जांभरकर, संजना फुणगुसस्कर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड अफसाना मुल्ला व नवानगर गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. Home Minister Program at Veldur Navanagar School