• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेजमध्ये निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ  

by Guhagar News
October 4, 2025
in Old News
88 1
2
Prize Ceremony at Regal College
173
SHARES
495
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन गटांमध्ये झालेल्या निबंध स्पर्धेमध्ये तालुक्यामधील दहा माध्यमिक तसेच पाच उच्च माध्यमिक शाळांमधील एकूण ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.  Prize Ceremony at Regal College

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वैष्णवी नेटके(सरपंच,ग्रामपंचायत, आबलोली), श्री. आसिम साल्हे(उपसरपंच,ग्रामपंचायत, पाटपन्हाळे), .एस.आर.कदम(उपमुख्याध्यापक,सरस्वती विद्यामंदिर, जामसूत)उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये प्रथम उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकेमध्ये रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन व्हावे तसेच विविध विषयांच्या संकल्पनेचे आकलन  व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे सांगितले.या स्पर्धेसाठी शाळा व शाळेतील मुख्याध्यापकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. Prize Ceremony at Regal College

Prize Ceremony at Regal College

सौ.नेटके म्हणाल्या की,निबंध स्पर्धेसाठी निवडलेले सर्वच विषय खूप महत्वाचे आहेत. रिगल कॉलेजमार्फत होणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले तसेच ग्रामपंचायतीमार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन केले.श्री. साल्हे यांनी तालुकास्तरीय स्पर्धा तसेच स्पर्धेचे विषय कौतुकास्पद आहेत असे सांगितले.तसेच ‘मिशन लोकशाही’ या मुख्यमंत्री उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे सांगितले. श्री.कदम सर आपल्या मोलाच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण होऊन तो भविष्यामध्ये चांगला माणूस व्हावा यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे असते असे म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कारणासाठी व्हावा. विज्ञान चळवळ ही पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न राहता त्यायोगे समाजात एकजूट होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. Prize Ceremony at Regal College

या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कु.कार्तिकी सुनील भोसले(श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर,गुहागर), कु. श्रेया सुशील अवेरे(न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे) कु. शौर्या प्रमोद पालशेतकर(श्रीमती आर.पी.पी.विद्यालय, पालशेत)यांना मिळाला.उत्तेजनार्थ चार पारितोषिके अनुक्रमे कु.गार्गी सचिन वंजारे(आदर्श विद्यालय,देवघर), कु.शर्वरी सुभाष मोहिते(सरस्वती विद्यामंदिर, जामसूत), कु.रीना राकेश कानसे(श्री सिद्धीविनायक विद्यामंदिर, मुंढर), कु. अमर चंद्रकांत रामगडे (माध्यमिक विद्यालय,वाघांबे)यांना मिळाला. Prize Ceremony at Regal College

उच्च माध्यमिक गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कु. समिधा संजय चव्हाण(कनिष्ठ महाविद्यालय,पाटपन्हाळे), कु.श्रद्धा दत्तात्रय टाणकर (कनिष्ठ महाविद्यालय,पाटपन्हाळे), कु. ऋचा प्रफुल्ल जाधव((श्रीमती आर.पी.पी.विद्यालय, पालशेत) यांना मिळाला तसेच उत्तेजनार्थ दोन पारितोषिके अनुक्रमे कु.सानिका संतोष वैद्य(चंद्रकांत बाईत कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली) व दिक्षा दिनेश घाणेकर (कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे) यांना मिळाला.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षिसांचे स्वरूप रोख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. Prize Ceremony at Regal College

यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. Prize Ceremony at Regal College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrize Ceremony at Regal Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.