गुहागर, ता. 04 : रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी आयोजित ‘रिगल नवदुर्गा पुरस्कार 2025’ प्राप्त पुरस्कार नूकताच प्रदान करण्यात आला. यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार सौ. जान्हवी धनंजय विखारे (सरपंच ग्रामपंचायत जानवळे), सौ अश्विनी सचिन ओक (नेत्ररोगतज्ञ, प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल), सौ. सायली अमेय परचुरे (शाखाधिकारी, बँक ऑफ इंडिया, शृंगारतळी) यांना बहाल करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Regal Navadurga Award 2025

रिगल परिवारातर्फे प्रतिवर्षी सामाजिक बांधिलकी जपत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना रिगल नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले. आपल्या प्रस्तावनेमध्ये सौ मोरे मॅडम यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व सांगत विद्यार्थी व जनमानसांमध्ये याद्वारे प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने रिगल परिवारातर्फे या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते असे सांगितले. Regal Navadurga Award 2025
यावेळी सौ.विखारे म्हणाल्या की, त्या सलग तीन वर्षे सरपंच म्हणून समाजकार्य करत आहेत. स्री सर्व आव्हाने स्वीकारत सर्व कामे करत असते. डॉ.सौ.अश्विनी ओक म्हणाल्या की, आजकालची स्त्री ही कोणतीही गोष्ट करू शकते. शहरांपेक्षा खेड्यामध्ये आपली जास्त गरज असते व आपण तिथे कार्य करावे असा सल्ला दिला. सौ.परचुरे मॅडम यांनी बँकिंग क्षेत्रातील आपले अनुभव सांगून आपल्या गावामध्ये काम करून आपल्या परिसराचा विकास करण्यास सांगितले. सर्वांनीच रिगल कॉलेज शृंगारतळी येथे सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास मदत केल्याबद्दल रिगल कॉलेजचे कौतुक केले. Regal Navadurga Award 2025

यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या बोंडला स्पर्धेच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक फॅशन डिझायनिंग, द्वितीय क्रमांक BCA, तृतीय क्रमांक हॉटेल मॅनेजमेंट तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक DMLT विभागास मिळाला. यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.सौ.सोनाली मिरगल यांनी केले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. Regal Navadurga Award 2025