व्याज परताव्यासोबत उद्योजकता प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. 02 : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देखील देणार आहे. Big decision of Annasaheb Patil Corporation
याकरिता उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 24 सप्टेंबर रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. ज्यामध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारमध्ये “पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय” या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. हे वेबिनार युट्युब, फेसबुकवर लाईव्ह दाखविण्यात आले होते. Big decision of Annasaheb Patil Corporation
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी या प्रशिक्षणात डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला, ज्यामुळे नवीन आणि इच्छुक उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. उत्तम जातीच्या जनावरांची निवड दुग्धव्यवसायासाठी अधिक दूध देणाऱ्या जातीच्या गाई-म्हशीची निवड कशी करावी, याचे मार्गदर्शन डॉ. माने यांनी केले. यामध्ये गीर, साहिवाल, जर्सी यांसारख्या देशी आणि विदेशी जातीची माहिती दिली. Big decision of Annasaheb Patil Corporation

आहारांचे महत्त्व जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य आहार कसा असावा, यावर त्यांनी भर दिला. संतुलित आहार, हिरवा आणि सुका चारा, तसेच आवश्यक खनिज मिश्रणे यांचे महत्व सांगितले. आरोग्याची काळजी, जनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सखोल माहिती दिली. वेळोवेळी लसीकरण करणे, स्वच्छतेचे नियम पाळणे आणि आजार झाल्यास त्वरित उपचार करणे यावर मार्गदर्शन केले. दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल, शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच दुधाची विक्री आणि मार्केटिंग याबद्दलही त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. Big decision of Annasaheb Patil Corporation
महामंडळाकडून पुढील दिवसात विविध जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन तज्ञांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालेल्या उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस मदत होणार असल्याचे मनोगत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. राज्यभरातून अनेक युवक, महिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते. वेबिनार दरम्यान लाभार्थ्यांनी आपल्या शंका उपस्थित करून थेट डॉ. माने यांच्याकडून उत्तरं मिळवली. Big decision of Annasaheb Patil Corporation