संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षातील गुहागर तालुक्यातील भंडारी भवन येथे ज्युडो कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत चंद्रकला फाउंडेशन संचालित अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोलीचा विद्यार्थी आयुष सुनील दाते याने 17 वर्षीय 66 – 73 वजनी गटात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Ayush Date First in Judo Karate Competition
आयुष याची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या जुडो कराटे स्पर्धेसाठी विभाग स्तरासाठी निवड करण्यात आली आहे. विभाग स्तरावर यश मिळवल्यानंतर तो राज्यस्तरावर बक्षीस पात्र होईल. आयुष सुनील दाते त्याच्याबरोबरच चंद्रकला फाउंडेशन संचलित अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली स्कूलच्या कु. श्रावणी प्रकाश वाघे, फरीना वसीम कुरेशी, मीनाक्षीकुमारी कृष्णकुमार सुंदासा यांनी विविध वजनी गटात प्रत्येकी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांना ज्युडो कराटे प्रशिक्षक सोनाली वरंडे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. Ayush Date First in Judo Karate Competition

आयुष सुनील दाते याच्यासह या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक कराटे प्रशिक्षिका सोनाली वरंडे यांचे चंद्रकला फाउंडेशन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सचिनशेठ बाईत, सचिव सौ.स्नेहल बाईत, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांचे सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Ayush Date First in Judo Karate Competition