आबलोली येथे मोफत चष्मे वाटप शिबिर
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख प्रमोदजी सिताराम गांधी यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त पडवे जिल्हा परिषद यांच्यावतीने रक्तदान शिबिर नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले. Blood donation camp organized by MNS

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, सोशल मीडिया अध्यक्ष प्रीतम सुर्वे यांचे सह तवसाळचे शाखाध्यक्ष निखिल गडदे, दीपक सुर्वे आदी. कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत. रक्तदान शिबिरासाठी भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावकर रुग्णालय डेरवण यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरच्या डॉ. सुनिता झुंबरवाड, रवी अग्रवाल, नम्रता आयरे, विदयेश जांगळी, सचिन रानिम, धनश्री चव्हाण, सिद्धू लाड यांची टीम मेहनत घेतली. नेत्र तपासणीसाठी सुरेंद्र ऑप्टिक्स माहीम, मुंबई टीमच्या वतीने डॉ.सुरेंद्र निकम, डॉ. दर्शना जाधव, डॉ. गौरव निकम, निर्मला माडीये, सचिन निकम अजय डिंगणकर यांची टीम मेहनत घेतली. Blood donation camp organized by MNS

या शिबिराला आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. या शिबिराला जिल्हा परिषद पडवे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Blood donation camp organized by MNS
