• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काताळे ग्रामपंचायतमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम

by Guhagar News
September 25, 2025
in Old News
92 1
0
Government at your doorstep initiative

काताळे ग्रामपंचायतीमध्ये तवसाळ सांडे लावगण या पुलासाठी संपादित होणाऱ्या जमिनींच्या मालकांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी श्री आकाश निगडे साहेब.

181
SHARES
516
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने उपविभागीय अधिकारी मा. आकाश लिगाडे यांचा उपक्रम

गुहागर, ता.  25 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्र नेते पंतप्रधान मान. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर  ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर या दरम्यान सर्व शासकीय विभाग सेवा पंधरवडा राबवत आहेत. Government at your doorstep initiative

या निमित्ताने चिपळूण उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी बुधवार दिनांक 24 रोजी काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तवसाळ खुर्द येथे रेवस रेड्डी महामार्गावरील जयगड खाडीवरील तवसाळ खुर्द  ते सांडे लावगण  हा पूल आणि जोड रस्ता यासाठी संपादित झालेल्या जमिनींचे खातेदार यांचे संमती पत्र करून त्यांचे करारनामे करून घेण्याचे शिबिर राबविले.  श्री लिगाडे साहेब यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तवसाळ खुर्द महसूल गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  Government at your doorstep initiative

Government at your doorstep initiative
उपविभागीय अधिकारी सन्मा. श्री आकाश लिगाडे साहेब यांचे सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांच्या हस्ते स्वागत 

या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या विभागाला दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी श्री लिगाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सर्व ग्रामपंचायतीनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणारे कायमस्वरूपाचे आणि लोकोपयोगी रस्ते गाव नकाशावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील सरकारी जमिनी त्यावरील अतिक्रमणे किंवा सरकारी जमिनीवर अत्यावश्यक असणारी नागरिकांची घरे याबाबतचा दुसरा टप्पा राबविला. Government at your doorstep initiative

तिसरा टप्प्यामध्ये  या उपविभागामधील  प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ वरीष्ठ महाविद्यालय यामध्ये अत्यावश्यक असणारे दाखले त्या त्या ठिकाणी देण्याचे उपक्रम राबवले जात आहे. उपविभागीय अधिकारी लिगाडे साहेब हे मागील २ वर्षांमध्ये चिपळूण विभागामध्ये असे विविध समाज उपयोगी, लोकोपयोगी आणि निसर्ग पूरक असे अनेक उपक्रम राबवत आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुकही केले.  Government at your doorstep initiative

Government at your doorstep initiative
काताळे ग्रामपंचायतीमध्ये तवसाळ सांडे लावगण या पुलासाठी संपादित होणाऱ्या जमिनींच्या मालकांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी श्री आकाश निगडे साहेब.

काताळे ग्रामपंचायत इमारत नुकतीच सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, उपसरपंच श्री प्रसाद शांताराम सुर्वे आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद यांच्या विशेष प्रयत्नाने पालकमंत्री महोदय श्री उदयजी सामंत साहेब, माजी आमदार डॉ.विनय नातू साहेब, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निलेश सुर्वे यांच्या विशेष सहकार्याने उभारण्यात आली आहे. या सुसज्ज व भव्य ग्रामपंचायतीचे उपविभागीय अधिकारी श्री आकाश लिगाडे साहेब, तहसीलदार श्री परीक्षीत पाटील साहेब यांनी व त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व सहकारी अधिकारी यांनी कौतुक केले.  Government at your doorstep initiative

Jakhadi Festival in Guhagar

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री आकाश लिगाडे साहेब, तहसीलदार श्री परीक्षित पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे, ग्रामपंचायत माजी सरपंच नम्रता निवाते, सदस्य मधुकर अजगोलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय मोहिते, तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष श्याम गडदे, तवसाळ गणपती मंदिर देवस्थान उपाध्यक्ष राजेश सुर्वे, रत्नदीप गडदे, विलास सुर्वे, तलाठी सचिन परदेशी, मंडळ अधिकारी ठसाळे, ग्रामपंचायत अधिकारी घडशी, तवसाळ काताळे पोलीस पाटील सचिन रसाळ, पडवे पोलीस पाटील बाळू शेठ गांधी, नरवण पोलीस पाटील रत्नाकांत जाधव परिसरातील इतर पोलीस पाटील, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका आधी सह बहुसंख्य जमीनदार व नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तलाठी श्री सचिन परदेशी, ग्रामपंचायत लिपिक अमोल सुर्वे, दीपक बारस्कर सोनाली पंडित, मंगेश झगडे, कोतवाल सौ.निमुणकर यांनी सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वात विशेष मेहनत घेतली. Government at your doorstep initiative

Tags: Government at your doorstep initiativeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.