महायुतीचा महाविकास आघाडीला मोठा दणका
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कोतळुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये गुहागर तालुका भाजपाचे सरचिटणीस आणि कोतळुक ग्रामपंचायत मध्ये गेली १३ वर्षे सदस्य म्हणून काम करणारे सचिन ओक यांनी महाविकास आघाडी उबाठा गटाच्या आसावरी बादावटे यांचा ६ – ४ मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केला आहे. Sachin Oak wins Kotaluk Upasarpanch election
सचिन ओक हे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन मागील ५ वर्ष तालुका सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. कोतळुक ग्रामपंचायतच्या २००७ सालच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही या पराभवाची चिंता न करता कोतळुक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहिले. यानंतर २०१२,२०१७, २०२२ मध्ये सलग ३ टर्म सदस्य म्हणून निवडून आले. यातील काही वेळा सर्व उमेदवार बिनविरोध होऊन ज्या ठिकाणी सचिन ओक सदस्याच्या निवडणुकीसाठी उभे राहिले फक्त त्याच एका जागेसाठी सुद्धा निवडणूक झाल्याचे चित्र होते मात्र अशा परिस्थितीतही ओक वेगवेगळ्या वार्ड मधून सदस्य म्हणून निवडून येत होते .२०१२,२०१७ साली उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिन ओक यांना विजयाने हुलकावणी दिली. मात्र सचिन ओक यांनी आपला गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास सोडला नाही आणि याचाच परिपाक म्हणून नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिन ओक याना समर्थन देणारे त्यांच्यासह फक्त ३ सदस्य असताना उबाठाच्या उमेदवाराचा ६ – ४ ने पराभव करत सचिन ओक विजयी झाले आहेत. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. Sachin Oak wins Kotaluk Upasarpanch election

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला उबाठा गटाला हा मोठा दणका म्हणता येईल. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच त्यावेळच्या शिवसेनेचे म्हणजेच भास्कर जाधव गटाचे वर्चस्व होते आणि त्यावेळी शितल गोरिवले या उपसरपंच झाल्या होत्या. मात्र यावेळी हा झालेला बदल म्हणजेच सचिन ओक यांचे सर्व समावेशक कार्य आणि नव्याने निर्माण झालेली महायुती याचाच विजय म्हणता येईल. या विजया बद्दल बोलताना सचिन यांनी माझे उपसरपंच पद हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आजपर्यंतचे प्रयत्न करत आहेत. त्या माझ्या प्रयत्नांची प्रेरणा वाढवणारे असेल. सतत २ निवडणुकां मी हरल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे नाराज न होता मीच कुठेतरी कमी पडलोय, असे म्हणून मी पुन्हा नव्याने काम करत राहिलो. कायमस्वरूपी गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास नजरेसमोर होता आणि याचमुळे आज १० सदस्यांपैकी ६ सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. जी ४ मते विरोधात गेली आहेत त्याबद्दल माझा कोणताही आकस नाही. या सर्वांना बरोबर घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने कोतळुक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. Sachin Oak wins Kotaluk Upasarpanch election
या विजयाबद्दल माजी आमदार डॉ.विनय नातू.भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेठ शिगवण, माझी महिला बालकल्याण सभापती सौ नीलम गोंधळी, नंदूशेठ गोंधळी, माजी सभापती विलास लांडे, गणपत शिगवण, जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य नेत्राताई ठाकूर, नवनीत ठाकूर, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी सरपंच दत्ताशेठ ओक, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश रांगळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जैतापकर, तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, दीपक मोरे, प्रसिद्ध उद्योजक अरुण शेठ गांधी, साईनाथ कळझुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अपुर्वाताई बारगोडे, वेळंब ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीकांत मोरे, सोशल मीडिया सेलचे दीपक मोरे, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते प्रकाश वीर आधीसह महायुती घटक पक्षातील सर्व पदाधिकारी आणि मित्र परिवाराने सचिन यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Sachin Oak wins Kotaluk Upasarpanch election