• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे ग्रामपंचायतबाबत आ. जाधव यांना निवेदन

by Ganesh Dhanawade
September 24, 2025
in Old News
112 1
0
Janvale villagers submit a statement to MLA Jadhav
220
SHARES
628
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत कार्यालय इमारत धोकादायक असून कार्यालयाची नवीन इमारत बांधून मिळण्याबाबत निवेदन आ. भास्कर जाधव यांना जानवळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. Janvale villagers submit a statement to MLA Jadhav

आ. भास्कर जाधव यांची गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे जानवळे ग्रामस्थांनी भेट घेऊन नवीन इमारतीसाठी निधी देण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, जानवळे इमारत ही धोकादायक असून खूप लहान आहे. एकूण क्षेत्रफळ ३६८ चौ.फु. आहे. छप्पर कौलारू असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळती होत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीची नेहमी डागडुजी करावी लागते. क्षेत्रफळ कमी असल्यामुळे मासिक सभेला सुध्दा जागा अपुरी पडत आहे. Janvale villagers submit a statement to MLA Jadhav

Jakhadi Festival in Guhagar

स्वयंसहाय्यता बचत गट मिटिंग, शेतकरी मेळावा, बचत गट मेळावा, ग्रामसभा यासारखे इतर कोणतेही उपक्रम अथवा मिटिंग सध्याच्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये घेता येत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन जागाही उपलब्ध नाही. अशा सर्व अडचणीमुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर इमारतीचे निर्लेखन झाले असून सद्यस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या खोलीमध्ये स्थलांतरीत करत आहोत. तरी वरील सर्व बाबींचा विचार करुन ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत बांधून मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.  Janvale villagers submit a statement to MLA Jadhav

यावेळी जानवळे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर, शिवसेना उपविभाग प्रमुख पिंट्या संसारे, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, सचिन कोंडविलकर, अर्जुन शितप, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोंडविलकर, अशोक जानवळकर, दीपक रहाटे, विजय जानवळकर, विश्वजीत पोतदार, राकेश रहाटे, सुदीप तुप्ते, अवधूत म्हादळेकर, सुशांत कोळंबेकर, कमलाकर वणगे, महेश तांबे, नामदेव बारे, धनंजय विखारे उपस्थित होते. Janvale villagers submit a statement to MLA Jadhav

आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी देण्याचे मान्य केले असून लवकरच इमारतीचे काम करण्यात येईल असे सांगितले. त्याचप्रमाणे जानवळे तेलीवाडीतील रस्त्याचे लवकरच भूमीपूजन करण्यात येईल असे सांगितले. Janvale villagers submit a statement to MLA Jadhav

Tags: GuhagarGuhagar NewsJanvale villagers submit a statement to MLA JadhavLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.