गुहागर, ता. 22 गुहागर तालुका मोटार मालक चालक वाहतूक संघ वार्षिक सर्वसाधारण सभा सदानंद गणपत कोलगे यांच्या अध्यक्षतेखाली नूकतीच संपन्न झाली. यावेऴी सर्व सभासदांना 14% डिव्हीडंट वाटप केला. संघाला ऑडिट वर्ग ब प्राप्त झालेला आहे. ही सभा पालपेणे येथील सदानंद कोलगे यांचे निवासस्थान घेण्यात आली. Motor Owners’ Drivers Association Meeting

या सभेला अध्यक्ष सदानंद गणपत कोलगे, उपाध्यक्ष भगवान शेठ कदम, सेक्रेटरी एकनाथ साळुंखे, लक्ष्मण शेठ शिगवण, आनंद गोखले, गोविंद खरे, गफार शेठ मेमन, निजाम शेठ साल्हे, शहानवाज मुजावर, प्रकाश बापट सर, प्रवीण आदवडे, वैभव आदवडे, आनंद कोलगे, सचिन खरे, सूर्यकांत चव्हाण हे उपस्थित होते. Motor Owners’ Drivers Association Meeting