गुहागर, ता. 22 : रत्नागिरी डाक विभागाचा “वित्तीय समायोजन मेळावा” दिनांक 23 सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ८:३० ते ४:३० या वेळेत गुहागर पोस्ट कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती गुहागर पोस्टमास्तर एस के दहिवलकर यांनी दिली आहे. Postal Department Financial Adjustment Meeting

या मेळाव्यामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी योजनांचा लाभ घेता येणार आहे. यात ग्रामीण डाक विमा, डाक विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सर्व सुविधा, जन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री किसान योजना खाती, माझी लाडकी बहिण योजना खाती, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची खाती, लहान मुलांचे आधार कार्ड काढणे, अपडेट करणे. आधार कॅम्प मध्ये आधार वरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, फोटो बदलणे, मोबाईल नंबर लिंक करणे असे आधार संबंधी सर्व प्रकारची सुविधा मिळतील. Postal Department Financial Adjustment Meeting