गुहागर, ता. 22 : “जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिन” निमित्त धोपावे ग्रामपंचायत यांच्या वतीने धोपावे तरीबंदर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, स्थानिक नागरिक, मच्छीमार भगिनी तसेच महिला स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान किनाऱ्यावरील प्लास्टिक, थर्माकोल, कचरा तसेच इतर अपघर्षक वस्तूंचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. समुद्रकिनारा हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असून त्याचे संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat

ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्लास्टिकमुक्त वातावरणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छ व सुंदर किनारा राखण्यासाठी ग्रामस्थांनी सतत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमामुळे धोपावे फेरी बोट परिसर स्वच्छ व आकर्षक झाला असून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat