• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवा निमित्त साखरकर परिवाराच्यावतीने सन्मान

by Guhagar News
September 20, 2025
in Old News
166 1
1
Honored by the Sakharkar family on the occasion of Ganeshotsav
325
SHARES
929
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : वरचापाट येथील साखरकर परिवाराच्यावतीने २१ दिवसीय गणेशोत्सव सोहळा पार पडला असून मोरयाच्या विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने गावातील खोत, देवस्थान अध्यक्ष तसेच महिला संघटिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील एकोपा, परस्परांबद्दलचे प्रेम आणि आपुलकी जपण्याचे सामूहिक मूल्य अधोरेखित झाले. Honored by the Sakharkar family on the occasion of Ganeshotsav

गावातील सर्व मंडळींनी एकत्र येत विसर्जन मिरवणूक आनंदमय वातावरणात काढली. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरलेला सन्मान समारंभ हा गावातील एकात्मतेचे प्रतीक ठरला. Honored by the Sakharkar family on the occasion of Ganeshotsav

साखरकर परिवाराच्या वतीने या सोहळ्यामध्ये गावाचे खोत पद्माकर भोसले, अरुण मोरे, विजय कचरेकर, मनोहर मोरे, सुभाष मोरे, प्रमोद कचरेकर, रामदास शेटे, नरनारायण देवस्थान अध्यक्ष मयुरेश साखरकर, श्री दत्त देवस्थान अध्यक्ष दत्तात्रय शेटे, महिला संघटिका अंजली विलास साखरकर या सर्व व्यक्तींनी गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. Honored by the Sakharkar family on the occasion of Ganeshotsav

साखरकर परिवाराच्यावतीने या सन्मानाचा उद्देश स्पष्ट करताना सांगण्यात आले की, गावात एकमेकांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा आणि सलोखा जपण्यासाठी ही मंडळी सातत्याने कार्यरत आहेत. गावातील एकात्मतेला बळकटी देण्यात आणि परंपरा पुढे नेण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. हाच सलोखा टिकवण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.  Honored by the Sakharkar family on the occasion of Ganeshotsav

या सोहळ्यास गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक झांज-पथक, लेझीम, तसेच महिला मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग होता. मोरयाच्या विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने झालेला हा सन्मान समारंभ गावाच्या सामाजिक एकजुटीचा, परंपरांवरील निष्ठेचा आणि सामूहिक सहभागाचा उत्तम आदर्श ठरला. संपूर्ण गावाने एकत्र येत गाव एकजुटीने टिकेल तेव्हाच खरी प्रगती घडेल हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. Honored by the Sakharkar family on the occasion of Ganeshotsav

Tags: GuhagarGuhagar NewsHonored by the Sakharkar family on the occasion of GaneshotsavLatest Marathi NewsLatest NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share130SendTweet81
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.