शृंगारतळी नवरात्री उत्सव मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
गुहागर, ता. 20 : श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ, शृंगारतळी कै. सुशिल वेल्हाळ यांच्यावतीने सोमवार दि. 22 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर 25 पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या नवरात्री उत्सवात महिलांसाठी मर्दा लाहोटी कलेक्शनच्या सौजन्याने खास लकी ड्रॉ व्दारे दररोज 1 पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच नवरात्रौ उत्सवात बालगट, युवकगट व खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फक्त पुरुषांसाठी कुसुमताई सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा श्रृंगारतळी यांच्या सौजन्याने लकी ड्रॉ स्पर्धा, तसेच रोज दोन उत्कृष्ट दांडीया नृत्यास चषक देण्यात येणार आहे. Shringartali Navratri festival

श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सवानिमित्त सोमवार दि. 22 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर 25 पर्यंत दररोज दांडीया रास याव्दारे महिलांसाठी लकी ड्रॉ व्दारे दररोज 1 पैठणी जिंकण्याची संधी व दोन उत्कृष्ट दांडीया नृत्यास चषक देण्यात येणार आहे. दि. 27 रोजी बालगट रेकॉर्ड डान्स स्पर्धा, दि. 29 रोजी युवकगट व खुला गटाच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, दि. 01 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दि. 02 रोजी बक्षिस वितरण असे कार्यक्रम होणार आहेत. Shringartali Navratri festival
तरी या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून शोभा वाढवावी व आनंद व्दिगुणित करावा, अशी नम्र विनंती श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज कोळवणकर, उपाध्यक्ष जय गुहागरकर, गौरव वेल्हाळ, उत्सव समिती अध्यक्ष दिपक दळी, उत्सव समिती उपाध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी केली आहे. Shringartali Navratri festival