गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते अजित जयराम बेलवलकर यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar
अजित बेलवलकर यांची या समितीच्या अध्यक्षपदी ही पाचव्यांदा निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.अजित बेलवलकर यांना सर्वंच क्षेत्रातील चांगला अनुभव आहे. त्यांना प्रगतशील अशा पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये शांतता व एकोपा राखण्यात यश मिळेल व खऱ्या अर्थाने गाव तंटामुक्त ठेवण्यात सफल होतील याचमुळे एक मताने त्यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar

यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, दिनेश कदम, दिनेश चव्हाण, सुधाकर चव्हाण, माजी पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण,प्रकाश चव्हाण,रामचंद्र तेलगडे, तुकाराम तेलगडे, चंद्रकांत तेलगडे, ग्रामविकास अधिकारी बदड , पोलीस पाटील खैर , विश्वास बेलवलकर, माजी सरपंच संजय पवार आदि उपस्थित होते. या सर्वांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar