गुहागर, ता. 17 : गेले बरेच महिने बंद असलेली आधार सुविधा गुहागर पोस्ट कार्यालयात पुन्हा सुरु झाली आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करणे ही गैरसोय दूर झाली आहे. Aadhaar service started at Guhagar Post

गुहागर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे अनेक जण शासकीय व बँकेच्या कामासाठी येत असतात. सध्या शासकीय योजना, पॅन कार्ड, बँक खाते, शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार MBU painding बायोमेट्रिक( बोटांचे ठसे) अपडेट केलेले नाहीत. तसेच जनतेचे आधार, आधार मोबाईल नंबर अपडेट केले नसल्यामुळे अत्यंत अडचणी येत आहेत. यासाठी आधार अपडेट असणे अत्यावश्यक आहे. Aadhaar service started at Guhagar Post

काही महिन्यापूर्वी गुहागर पोस्टातही ही सुविधा उपलब्ध होती परंतु बंद झाली. तसेच एक खाजगी सुविधा केंद्र सेवा होते तेही गेले सहा महिने नवीन टेंडर मध्ये अडकल्यामुळे बंद आहे. गुहागर तालुक्यात सध्या अडूर, आबलोली, शृंगारतळी व तळवली या चार ठिकाणी खाजगी आधार सेवा केंद्र सुरू आहेत. परंतु तालुक्याचे ठिकाण असलेल्या गुहागर मध्येच ही सुविधा काही महिने उपलब्ध नव्हती. यामुळे आधार कामाला अडूर किंवा तळी येथे गुहागर वासियांना जावे लागत होते. मात्र आता ही गैर सोय दुर झाली आहे. Aadhaar service started at Guhagar Post
स्वतंत्र कर्मचारी नेमून दिवसभर आधारची सेवा नागरिकांना द्यावी: नरेश पवार गुहागर पोस्ट कार्यालयात आधारचे काम सुरू झाले, परंतु आधार चे काम दुपारी तीन नंतरच होतं. त्यात अनेक वेळा लाईट नसणे, नेट प्रॉब्लेम होत असतात. गुहागर पोस्टात जनरेटर व इन्व्हर्टर या दोन्ही सुविधा उपलब्ध असून त्या बंद स्थितीत आहेत. यामुळे नागरिकांना सतत फेरा माराव्या लागतात. वरिष्ठांनी या आधार सुविधेसाठी गुहागर पोस्ट कार्यालयात स्वतंत्र कर्मचारी नेमून दिवसभर सेवा द्यावी. अशी मागणी गुहागर भाजपचे शहराध्यक्ष नरेश पवार यांनी केली आहे. Aadhaar service started at Guhagar Post