स्वच्छतेच्या नियोजनासाठी पार पडली बैठक
गुहागर, ता. 15 : गुहागर शहर सर्वांग सुंदर दिसावं, गुहागर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अनुभवास मिळावा. यासाठी गुहागर नगरवासीय संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करणार आहे. आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस स्वच्छतेच्या चळवळीने राबवला जावा याच्या नियोजनाची बैठक श्रीदेव व्याडेश्वर सभागृहामध्ये शहरवासीयांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. Cleanliness of Guhagar beach
गुहागर नगरपंचायतीच्या वतीने या नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते 20 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्याचे औचित्य साधून संपूर्ण शहरवासीयांना बरोबरी घेऊन स्वच्छतेची ही मोहीम अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार आहे याच्या नियोजनासाठी शनिवारी श्री व्याडेश्वर देवस्थान सभागृहामध्ये घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र भाऊ काटदरे, गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण उपस्थित होते. Cleanliness of Guhagar beach

या बैठकीतून गुहागर संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले. दरवेळेला काही ठराविक ठिकाणांची स्वच्छता होते मात्र गुहागर शहराला लाभलेला सहा किलोमीटरचा समुद्रकिनारा हा स्वच्छ व्हावा यासाठी सात विभाग पाडण्यात आले. यामध्ये पाच माड परिसर ते पिंपळादेवी मंदिर, दुर्गादेवी मंदिर ते भोसले गल्ली, भोसले गल्ली ते रामेश्वर स्मशानभूमी, रामेश्वर स्मशानभूमी ते बाजारपेठ, बाजारपेठ ते किस्मत आणि किस्मत ते खालचा पाठ. अशा सात विभागाचे प्रतिनिधित्व देण्यात आले या विभागाचे प्रतिनिधित्व घेणारा व्यक्ती आपल्याबरोबर स्वच्छता दूत घेऊन येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक विभागात नगरपंचायत कर्मचारी स्वच्छता कर्मचारी बचत गटाचे सदस्य असा 50 जणांचा ग्रुप करण्यात आला आहे. अशा नियोजनबद्ध स्वच्छता मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले, असून यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भाऊ काटदरे यांनी मार्गदर्शन करताना शहराची सुंदरता स्वच्छता याविषयी तसेच आपला परिसर अधिक निसर्गरम्य कसा ठेवता येईल याचे मार्गदर्शन केले तर यावर्षी कासव महोत्सव राबवण्याचेही नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. Cleanliness of Guhagar beach
यावेळी प्रवीण जाधव, सुनील नवजेकर, सचिन जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन मुसळे, संतोष वरंडे, शामकांत खातू, मयुरेश पाटणकर, माजी नगराध्यक्ष सौ स्नेहा वरंडे, बचत गटाच्या प्रमुख सौ पालशेतकर, पराग मालप, श्रीधर बागकर, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Cleanliness of Guhagar beach