ग्रामस्थांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायत सरपंच अतुल लांजेकर आणि ग्रामसेवक यांनी अनेक शासकीय योजना राबवताना आर्थिक व्यवहाराचा लाखो रुपयांचा घोटाळा आणि गैरव्यवहार केला. याबाबत माहिती तक्रार करून शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला देणार आहोत. तसेच सरपंच यांचेवर अविश्वास दर्शक ठराव दाखल करणार असून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्या संदर्भात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली. Zombadi Sarpanch Gramsevak Wrong Dealing

झोंबडी ग्रामपंचायत येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या वतीने गावात विकास कामे करताना किंवा वस्तू खरेदी करताना त्यावर खर्च प्रमाणापेक्षा जास्त करून कमी किमतीची कमी दर्जाची वस्तू जास्त किमतीत विकत घेणे, टेंडर न काढता (पेपरला जाहिरात न देता) कामे करणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्रामस्थांना वितरित करणे, असे अनेक आरोप ग्रामस्थांनी केले असून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरपंच यांचेवर अविश्वास दर्शक ठराव दाखल करणार आणि सरपंच व ग्रामसेवक यांचेवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ग्रामस्थानीं पत्रकार परिषदेत दिली. Zombadi Sarpanch Gramsevak Wrong Dealing
