निगुंडळ येथील दोन मुलींचं भविष्य घडवणारा प्रेरणादायी उपक्रम
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील निगुंडळसारख्या दुर्गम खेड्यातील दोन हुशार मुलींचे शिक्षण आता थांबणार नाही. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संपदा कुंटे यांनी या मुलींच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनी शैक्षणिक साहित्य वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ केला. Distribution of educational materials on Teacher’s Day
निगुंडळ येथील पायल धामणस्कर (इ. ११ वी सायन्स) आणि मंजिरी धामणस्कर (इ. ७ वी) या दोन बहिणी असून त्यांचे पालक मजुरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मुली शिक्षणात अत्यंत हुशार आहेत. मात्र वाढत्या खर्चामुळे त्यांचे शिक्षण धोक्यात आले होते. हे लक्षात घेऊन येथील प्रज्ञा धामणस्कर-ताम्हणकर व संदीप चव्हाण यांनी या कुटुंबासाठी धडपड केली व त्यातून सौ. संपदा कुंटे यांच्यामार्फत ही मोलाची मदत मिळाली. Distribution of educational materials on Teacher’s Day

पुणे येथील सौ. संपदा कुंटे या रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या सरचिटणीस व सेवार्थ फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. या दोनही मुलींचा 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीचा आवश्यक सर्व खर्च सौ. कुंटे उचलणार आहेत. यापूर्वीही सौ. कुंटे यांनी सेवार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करून त्यांचे भविष्य उजळवले आहे. या मदतीमुळे केवळ दोन मुलींचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी संदीप चव्हाण, प्रज्ञा धामणस्कर-ताम्हणकर, मुलींचे पालक, ग्रामस्थ संदीप खोले, निष्णात ताम्हणकर आदी उपस्थित होते. Distribution of educational materials on Teacher’s Day