गुहागर, ता. 10 : गुहागर शिवसेना आयोजित पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत शाडू मातीचे स्वतः केलेली गणेश मूर्ती व सजावट तसेच कोकणातील बारव याचा हुबेहूब नैसर्गिक देखावा साकारणाऱ्या परचुरी येथील माजी सरपंच सत्यवान दर्देकर यांना प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शांताई रिसॉर्ट, पाटपन्हाळे येथे संपन्न झाले. Prize Distribution of Ganeshotsav Decoration Contest
या तालुकास्तरीय गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सत्यवान दरेकर, (परचुरी), द्वितीय क्रमांक मकरंद विचारे (वरवेली), तृतीय क्रमांक समीर महाडिक, (वरवेली), चतुर्थ क्रमांक सोहम पवार (देवघर), पंचम क्रमांक यश विजय गुजर, (देवघर) यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या ऑनलाइन सजावट स्पर्धेचे परीक्षण कमर्शियल आर्टिस्ट सत्यजित भोसले यांनी केले. Prize Distribution of Ganeshotsav Decoration Contest

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त मकरंद विचारे वरवेली यांनी प्लास्टिकचा सुयोग्य वापर करून देखावा साकारला तृतीय क्रमांक, समीर महाडिक देवघर यांनी पर्यावरण पूरक सजावट केले चतुर्थ क्रमांक, सोहम पवार देवघर यांनी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली. पाचवा क्रमांक मिळवणाऱ्या यश गुजर देवघर यांनी मराठी आशा संवर्धन विषय मांडला. प्रथम क्रमांक 11 हजार 111, द्वितीय क्रमांक 7 हजार 777, तृतीय 5 हजार 555, चतुर्थ 3 हजार 333, पाचवा क्रमांक 2 हजार 222 रोख बक्षीस सन्मानचिन्ह देऊन शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेत 51 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण कमर्शियल आर्ट डिग्री प्राप्त मूर्तिकार सत्यजित भोसले यांनी केले. बक्षीस समारंभावेळी विपुल कदम म्हणाले की, गणेशोत्सवात कोकणवासीय व येणारे चाकरमानी भक्ती भावनेने गणरायाची सेवा करतात. गणेशभक्तांनी केलेली गणेश मूर्ती सजावट सर्वांसमोर येऊन हा आनंद आणखी द्विगुणित व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. प्रथम क्रमांक प्राप्त सत्यवान दर्देकर यांनी सांगितले की, गणेश मूर्ती शाडू मातीचे हाताने बनवले आहे. तसेच सजावटीसाठी लाकूड जांभाजीरा कागद दिवे पणत्या नैसर्गिक रंग वापरले आहेत. कोकणातील बारव म्हणजेच घोडबाव ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राचा, जलव्यवस्थापन व वास्तुकलेचा अलौकिक नमुना आहे. त्यामुळे पाणी साठा वाढण्याबरोबरच प्राणी पक्षी यांना पिण्याचे पाणी यामधून उपलब्ध होते. हवामान बदलाच्या संकटातून टिकून राहिलेल्या या बारव पुढील काळात जतन करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य नेत्रा ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, तालुका सचिव संतोष आग्रे, अमरदीप परचुरे, ज्योत्स्ना काताळकर, सागर गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. Prize Distribution of Ganeshotsav Decoration Contest