रत्नागिरी, ता.09 : गोवा येथून बेलापूरकडे निघालेला एक बार्ज दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणींमुळे भरकटले होते. तो रत्नागिरी जिल्ह्यातील रनपार बंदरात विसावला. दोन महिने उलटूनही हा बार्ज अद्याप त्याच ठिकाणी असून, त्याच्या दुरुस्तीसाठी मालकांनी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. Lost barge still in port after two months
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी हा बार्ज एका टग आणि एका छोट्या होडीसह समुद्रमार्गे प्रवास करत होता. अचानक यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो भरकटला. सुरक्षिततेच्या दृष्टीने या बार्जला रनपार बंदरात आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलिस ठाणे आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बार्जची पाहणी केली आणि संबंधित मालकांशी संपर्क साधला. त्यावेळी बार्जमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळली नाही. बार्जवरील दहा ते बारा खलाशांचीही तपासणी करण्यात आली. Lost barge still in port after two months

यानंतर, बार्ज मालकांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त करून तो पुन्हा घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने उलटले तरी बार्ज त्याच ठिकाणी आहे. यामुळे स्थानिक प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात, पोलिस अंमलदार महेश मुरकर यांनी सांगितले की, “आमचे सागरी पोलिस ठाणे या बार्जवर विशेष लक्ष ठेवून आहे. यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आली नाही. आम्ही परिसरामध्ये गस्त सुरू ठेवली आहे. संबंधित बार्जचे मालक लवकरच तांत्रिक अडचणी दूर करून तो घेऊन जातील, अशी आम्हाला आशा आहे.” या घटनेमुळे, भरकटलेल्या जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन मालकांकडून ठोस कार्यवाहीची वाट पाहत आहे, जेणेकरून हा बार्ज लवकरच रनपार बंदरातून बाहेर काढला जाईल. Lost barge still in port after two months