रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती
गुहागर, ता. 06 : उद्या रविवारी दि. 7 रोजी पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या पाच तासांच्या जम्बो ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणि गैरसोय होण्याची शक्यता आहे. Mega block between Santacruz and Goregaon

दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत, अप आणि डाउन अशा दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. या पाच तासांच्या ब्लॉगमध्ये अनेक काम केली जाणार आहेत. महत्त्वाचे ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट, सिग्नल देखभालीची कामं केली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहेत. लोकल ट्रेन, रेल्वेच्या सुरक्षित नेटवर्कसाठी ही कामं महत्त्वाची असल्याने ब्लॉग घेत असल्याचं ते म्हणाले. लोकांची गैरसोय होत असली, तरी प्रवाशांच्या पुढील गैरसोय कमी करण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. Mega block between Santacruz and Goregaon
प्रवाशांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यानुसार आपल्या प्रवासाचं नियोजन करण्याचा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वेच्या तीनही मार्गांवर पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर वेळोवेळी मेगा ब्लॉक घेतला जातो. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, लोकल ट्रेनच्या मेनटेन्ससाठी हा ब्लॉग असतो. मेगा ब्लॉकदरम्यान अनेक लोकलच्या मार्गात बदल केले जातात. धिम्या आणि जलद मार्गांवर वाहतूक विस्कळित होते. मात्र या ब्लॉकमध्ये अनेक तांत्रिक कामं केली जातात. यामुळे लोकल सेवा सुरक्षितपणे आणि सुरळितरित्या धावते. Mega block between Santacruz and Goregaon