टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील सात दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. Ganapati immersion ceremony at Tavasal

दरवर्षी गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेले सात दिवस प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस भजन, जाकडी नृत्य, महिलांचे नाच व अन्य कार्यक्रमाने वातावरण भक्तीमय झाले होते. Ganapati immersion ceremony at Tavasal

गौरी गणपतींच्या मूर्तींची टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढली जाते. शेवटी जाकडी नृत्य व आरती करत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणराया तुझ्या आगमनाने कोकणची भूमी प्रसन्न झाली तुला निरोप घेताना अश्रू अनावर झाले म्हणून साद घालत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या भक्ती भावाने निरोप घेत समारोह झाला. Ganapati immersion ceremony at Tavasal