भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर यांचे निवेदन
गुहागर, ता. 23 : गुहागर पोस्ट कार्यालयात गेले अनेक महिने पासबुक प्रिंटर नसल्याने ग्राहकांना विनाकारण फेऱ्या मारायला लागत आहेत. तरी लवकरात लवकर प्रिंटर आणावा, अशी मागणी भाजपा गुहागर तालुका महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उद्यापासूनच प्रिंटर ची सेवा उपलब्ध होईल, असे पोस्ट कार्यालयातून आश्वासन देण्यात आले आहे. Passbook printer closed at Guhagar Post

सध्या पावसाळ्यात लाईटचा खेळ खंडोबा सुरू आहे. गुहागर पोस्टात इन्व्हर्टर सेवा व जनरेटर असूनही या दोन्ही सेवा बंद झाल्यामुळे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत .अनेकदा लाईट नसल्यामुळे ग्राहकांना परत जावे लागत आहे. गुहागर पोस्ट ऑफिस हे बाजार पासून लांब असल्यामुळे ग्राहकांना नाहक बुरदंड पडत असल्याचे गुहागर भाजपा शहराध्यक्ष नरेश पवार यांनी पोस्ट मास्तर यांना लवकरात लवकरच दुरुस्त करून ग्राहकाची अडचण दूर करावी अशी मागणी केली. Passbook printer closed at Guhagar Post

गुहागर हे तालुक्याचे ठिकाण असून येथील पोस्ट कार्यालयात अनेक ग्राहकांची खाती आहेत. येथे गेले अनेक महिने प्रिंटर नसल्याने ग्राहकांना आपल्या खात्यातील रक्कमेचा तपशील समजत नसल्याने व्यवहार करण्यात अडचणी येत आहे. तरी या कार्यालयात लवकरात लवकर प्रिंटर आणून ग्राहकांची अडचण दूर करावी. तसेच आय पी बीपी खात्यातील पैसे काढण्याची वेळ 8.30 ते 11 आहे ती 9 ते 12 करावी तसेच या खात्यासाठी एक लाख रुपयांची मर्यादा वाढवून मिळावी, अशा मागणीचे निवेदन भाजप गुहागर तालुका महिला मोर्चा तालुका अध्यक्ष प्रांजली कचरेकर यांनी गुहागर पोस्टात दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, संजय मालप, महिला शहर अध्यक्ष स्मिता जांगळी, अपूर्वा बारगुडे आदी उपस्थित होते. Passbook printer closed at Guhagar Post