गुहागर, ता. 22 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्याबाबत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून गुहागर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. Indefinite strike of health workers

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदावर काम करीत असलेल्या कर्मचारी यांना 14 मार्च 2024 च्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियमित सेवेत समायोजन बाबत शासन निर्णय झाला असता याबाबतची सव्वा वर्ष कालावधी होऊनही कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच मानधन वाढ, रॉयल्टी बोनस ईपीएफ इन्शुरन्स बदली धोरण मान्य होत नसल्याने, त्याचबरोबर आरोग्य मंत्री यांनी दिनांक 8 व 10 जुलै रोजी संघटनेच्या शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या आंदोलनाच्या कालावधीत तालुका अंतर्गत लसीकरण सत्र विविध अहवाल तसेच ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपाची सर्व कामे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. Indefinite strike of health workers