गुहागर, ता. 21 : रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. The boat sank in the sea.

बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर देखील बोलवण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे. बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाली. दरम्यान युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू केलं आहे. ही बोट कोणाची आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीतहानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खुलासा झालेला नाही. The boat sank in the sea.
वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात कशी आली याची माहिती समोर आलेली नाही. समुद्राला आलेलं उधाण पाहता मच्छिमारांनी काळजी घेणं गरजेचं आहे, सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचावकार्य तातडीनं होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. ही बोट बुडाल्यानंतर काही जण बुडताना दिसत आहेत. ही बोट मच्छिमारांची आहे का? की कोणी दुसरे घेऊन जात होते? समुद्राला मागचे चार दिवस उधाण होतं हे माहिती असूनही बोट का गेली? याबाबत देखील सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. The boat sank in the sea.