ॲनालॅटिक्सचा अहवाल म्हणजे वाचकांच्या समाधानाची पोचपावती
गुहागर न्यूज : २० ऑगस्ट २०२० रोजी सुरू झालेल्या गुहागर न्यूजने अल्पावधीतच स्थानिक वाचकांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला मोजके वाचक असले तरी सातत्यपूर्ण बातम्या आणि स्थानिकतेवर भर दिल्यामुळे वाचकसंख्या झपाट्याने वाढत गेली. गेल्या पाच वर्षात 7 लाख 16 हजार वाचकांनी Guhagar News च्या वेबसाईटला भेट दिली आहे. तर गुहागर न्यूजच्या YouTube Channel वरील Subscribers ची संख्या 6800 हून अधिक आहे. न्यूज पोर्टलच्या 5 वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, पत्रकार व वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे गुहागर न्यूजच्या संचालकांनी आभार मानले आहेत. Guhagar News 5 years Journey
गुहागर न्यूजची सुरुवात आणि पहिली पावले
20 ऑगस्ट 2020 मध्ये गुहागर न्यूज सुरु झाले. तेव्हा हे पोर्टल चालणार नाही अशी चेष्टा काहीजणांनी केली. नंतर चेष्टेचे रुपांतर टिका करण्यात झाले. सुरवातीच्या काळात काही चूका झाल्या त्यांचे भांडवल करुन गुहागर न्यूजला बदनाम करण्याचा पध्दतशीर प्रयत्न झाला. या संकटातून लढत, अडखळत प्रवास करता करता 2023 या वर्षात गुहागर न्यूजची वाटचाल यशाकडे सुरु झाली. गुहागर न्यूजच्या बातम्या परदेशात वाचल्या जावू लागल्या. न्यूज पोर्टलच्या क्षेत्रात नवे असल्याने आम्ही काही प्रयोग केले. कीवर्ड, एसईओ मध्ये सुधारणा केल्या. परिणामी गेल्या 2 वर्षात नवनवीन उच्चांक स्थापन करण्यात, वाचकांच्या पसंतीस उतरण्यात आम्ही यशस्वी झालो. Guhagar News 5 years Journey

एंगेजमेंट टाइम वाढला
एंगेजमेंट टाइम म्हणजे वेबसाईटवर आलेला वाचक कितीवेळ थांबतो ती वेळ. वेबसाईटच्या क्षेत्रात संबंधित वेबसाईटवर येणारा माणूस प्रदिर्घ काळा वेबसाईटवर काही शोधत राहीला तर आदर्शस्थिती मानली जाते. किमान 1 मिनिट वेबसाईटवर थांबणे चांगल्या स्थितीत मोडते. आमचा प्रवास सुरुवातीच्या काही सेकंदांवरून सरासरी १ मिनिटापर्यंत झाल्याचे Google Analytics दाखवत आहे. यावरून वाचक केवळ पान उघडत नाहीत तर बातम्या वाचण्यासाठी थांबतात हे स्पष्ट होते. स्थानिक महत्त्वाच्या घटनांदरम्यान गुहागर न्यूजने विक्रमी वाचकसंख्या नोंदवली. या शिखर क्षणांनी गुहागर न्यूजचा प्रभाव अधिक बळकट केला. Guhagar News 5 years Journey
गुहागर न्यूजकडे येणारा ट्रॅफिक
थेट वाचक (Direct Traffic) 79% – गुहागर न्यूज वाचक थेट वेबसाइटवर येतात. हे ब्रँडवरील विश्वासाचे द्योतक आहे.
गुगल सर्च (Organic Search) 11% – गुगल शोधामधूनही लक्षणीय प्रमाणात वाचक गुहागर न्यूजकडे पोहोचतात.
रिफरल्स 10% – इतर वेबसाईट्स आणि लिंकद्वारेही वाचकसंख्या वाढली आहे. सध्या सोशल मीडियामधून वाचक उपस्थिती संधी वाढत आहे.

स्थानिकतेवर भर – यशाचे गमक
आमच्या बातम्या विश्वासार्ह आणि ताज्या असतात. गुहागर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अजुनही त्यात पूर्णपणे यश मिळालेले नाही. ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मात्र बातमीची सत्यता पडताळून पाहील्याशिवाय बातमी देत नाही. त्याचप्रमाणे आरोप प्रत्यारोपांच्या, राजकीय टिप्पणी करणाऱ्या बातम्या आम्ही जाणिवपूर्वक टाळतो. स्थानिक बातम्यांबरोबरच काहीवेळा अन्यत्र प्रसिध्द न झालेल्या देशपातळीवरील बातम्या देण्याचाही आमचा प्रयत्न असतो. सोप्या भाषेत मांडणी केल्याने सर्वसामान्य जनतेला बातमीतून घटनेचा उलगडा होत जातो. म्हणूनच दिवसेंदिवस वाचक संख्या वाढत आहे. Guhagar News 5 years Journey
वाचकांचा विश्वास हीच खरी ताकद
गुहागर न्यूजचा प्रवास म्हणजे विश्वास, सातत्य आणि स्थानिकतेवर भर यांची कहाणी आहे. वाचकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा पाच वर्षांचा प्रवास यशस्वी ठरला आहे. आणि आगामी काळात तो आणखी विस्तारेल यात शंका नाही. Guhagar News 5 years Journey