• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा

by Manoj Bavdhankar
August 18, 2025
in Guhagar
92 1
1
Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti
180
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्वितीय वारशाचे स्मरण करून, त्यांच्या शिकवणीप्रमाणे सत्य, प्रेम व एकतेचा संदेश पसरविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केला. Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

सोहळ्याची सुरुवात मंगलमय वातावरणाने गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” या गजरात झाली. पालखीचे सुशोभित रथ, फुलांनी सजवलेली माऊलींची पालखी आणि भजन-कीर्तनांचा सोहळा गावभर दिंडीतून निघाला. या वेळी गावातील महिला भगिनींनी फुगडी व नृत्यांनी सोहळ्याला रंगत आणली. Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक वर्ग विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,स्थानिक मंडळे तसेच सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला. संतांच्या कार्याचा, भक्तीमार्गाचा आणि समाज प्रबोधनाच्या विचारांचा ऊहापोह करण्यात आला. शेवटी पसायदानाने विठ्ठल रखुमाई मंदिर जाधव वाडी येथे कार्यक्रमाची सांगता झाली. Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPalkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayantiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.