• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. धोपावे-तेटलेत “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत ध्वजारोहण

by Manoj Bavdhankar
August 18, 2025
in Guhagar
68 1
0
Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale
134
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत धोपावे-तेटले कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून सलग तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात १३ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती. दर्शना महेंद्र पावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १४ ऑगस्ट २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत सदस्य श्रीमती. ऐश्वर्या युवराज जांभारकर यांना मिळाला. स्वातंत्र्य दिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या दिवशी ध्वजारोहणाचा मान आपल्या गावातील दहावी आणि बारावी परीक्षेत सर्वोत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानुसार दहावीतील गुणवंत विद्यार्थी कु. पार्थ लवु नाटेकर व बारावीतील गुणवंत विद्यार्थीनी कु. मेहक अल्ताफ खान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale

या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक एकजूट या भावनांना अधोरेखित करणारे संदेश देण्यात आले. ग्रामपंचायत धोपावे-तेटलेत सलग तीन दिवस झालेले हे ध्वजारोहण सोहळे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale

Tags: Flag hoisting ceremony at Dhopave-TetaleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi Newsटॉप न्युजमराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.