• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संस्कृत बोधवाक्य असलेला पहिलाच सायकल क्लब

by Guhagar News
August 12, 2025
in Ratnagiri
74 1
0
First cycle club with Sanskrit motto
146
SHARES
417
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संस्कृतचे ज्ञानभांडार प्रत्येकाने जपावे; पोलिस अधीक्षक नितीन बगाटे


रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या “नित्यनिरंतरगतिशीला:” या बोधवाक्याचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या हस्ते नुकतेच झाले. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात सकाळी ठिक ७ वाजता हा कार्यक्रम झाला. गेल्या साडेतीन वर्षांत २५ हून अधिक यशस्वी उपक्रमांमधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सिद्ध केले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब ही रत्नागिरीची खरी ओळख आहे. आता याच सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नित्यनिरंतरगतिशीला: या बोधवाक्याची जोड मिळाली आहे. First cycle club with Sanskrit motto

First cycle club with Sanskrit motto

प्रगतिपथान्नहि विचलेम परम्परां संरक्षेम | समुत्साहिनो निरुद्वेगिनो नित्यनिरन्तरगतिशीला: || या संस्कृत भारतीच्या गीतामधून बोधवाक्य घेण्यात आले आहे. याकरिता संस्कृत भारतीचे बहुमोल सहकार्य मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीत प्रथमच संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भारतीतर्फे संस्कृत सप्ताह साजरा होत असून या अंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या बोधवाक्याचे अनावरण शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात करण्यात आले. या वेळी क्लबचे प्रतिनिधी राकेश होरंबे, संस्कृत भारतीच्या प्रांताध्यक्ष डॉ. कल्पना आठल्ये, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख अक्षया भागवत, कोकणप्रांत प्रशिक्षणप्रमुख अॅड. आशिष आठवले आदी मंचावर प्रमुख उपस्थित होते. First cycle club with Sanskrit motto

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे म्हणाले की, संस्कृत ही भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेत खूप गोडवा आहे, पावित्र्य व भरपूर ज्ञानभांडार आहे, त्यातील ठेवा जपला पाहिजे, प्रत्येकाने ते आत्मसात करण्याची आज वेळ आली आहे. यासोबतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने (आरसीसी) सायकल चालवून, स्वास्थ्य जपून सुदृढ आरोग्य प्राप्त करत आहे. त्यामुळे बोधवाक्याप्रमाणे संस्कृत जपा व नित्य निरंतर सायकल चालवून गतिशिल राहा. First cycle club with Sanskrit motto

इंग्रजी बोधवाक्य असलेले अनेक सायकल क्लब आहेत. पण सध्या तरी संस्कृत बोधवाक्य असणारा रत्नागिरी सायकलिस्ट क्लब हा बहुदा पहिलाच क्लब आहे. भारतीय नौदल, हवाईदल, आयआयटी, पोलिस दल यासारख्या संस्थांप्रमाणे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनेही संस्कृतमधील बोधवाक्य अंगिकृत केले आहे. या वेळी क्लबच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. त्यावरही नवे बोधवाक्य झळकले आहे. First cycle club with Sanskrit motto

संस्कृतचा प्रचार, प्रसार होण्यासाठी संस्कृत भारती व दररोज सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढण्याकरिता रत्नागिरी सायकलिस्ट क्लब कार्यरत आहे. त्यामुळेच या दोन्हीसाठी योगदान देणाऱ्या प्रसाद देवस्थळी यांनी बोधवाक्याची संकल्पना मांडली. त्याला संस्कृत भारतीने पाठबळ दिले. याप्रसंगी देवस्थळी यांचा सत्कार पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कृत भारती व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी मेहनत घेतली. First cycle club with Sanskrit motto

Tags: First cycle club with Sanskrit mottoGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.