गुहागर. ता. 12 : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर आयोजित बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे सभागृह येथे संपन्न झाला. Student appreciation by the Teacher-Parent Association
अखिल रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा पदाधिकारी व अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ आरोही शिगवण मॅडम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री पागडे सर यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय गुणवत्ताधारक विद्यार्थी, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी मधील विद्यालयातील प्रथम प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार, तालुक्यातील वर्षभरात सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, नासा व इस्रो करिता निवड झालेले विद्यार्थी, प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषिक, आकर्षक सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Student appreciation by the Teacher-Parent Association

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुहागर पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोहन उकार्डे, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र घुले, जिल्हा शिक्षक पतपेढीचे माजी व्हाईस चेअरमन सुनील रामाने, दापोली तालुका अध्यक्ष विजय फड, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पंचायत समितीचे परमेश्वर लांडे, दापोली तालुका संघटक हंगे सर, बांद्रे सर, प्रभू हंबर्डे, सरपंच विजय तेलगडे, सेवानिवृत्त शिक्षिका परचुरे मॅडम, रायकर मॅडम, धामणस्कर मॅडम, मकरंद विचारे, चंद्रकांत हळे सर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पागडे, जिल्हा नेते सुरेश बोले, तालुकाध्यक्ष मनोज पाटील, सल्लागार दत्तात्रय गुरव, समितीचे तालुकाध्यक्ष बेलेकर, नंदकुमार पवार, सुनील वाघे आदी मान्यवर उपस्थित होते. Student appreciation by the Teacher-Parent Association

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पागडे, अध्यक्ष मनोज पाटील, सचिव श्री जोगले सर, श्री गोरीवले सर, श्री सतीश विचारे सर, श्री निळकंठ पावसकर सर ,श्री गोणबरे सर . श्री मोहन पागडे सर ,श्री बोले सर.,श्री अशोक पावस्कर सर व सर्व अखिल टीम यांनी प्रयत्न केले. जिल्हा सरचिटणीस भालचंद्र घुले, शिक्षण विस्तार अधिकारी मोहन उकार्डे, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, मा.व्हाईस चेअरमन सुनील रामाने ,समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बेलेकर यांनी मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ आरोही शिगवण मॅडम म्हणाल्या की, अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने दरवर्षी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असून तालुक्यातील शिक्षण चळवळीला त्यामुळे निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. गेली 32 वर्ष अखंडितपणे हा उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल तालुका शाखेचे त्यांनी अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाचन व अभ्यास विद्यार्थ्यांनी सुरू ठेवावा. खडतर मेहनत, अभ्यास करून आपल्या ध्येयाला गवसणी घालावी असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील व प्रकाश जोगले यांनी केले. Student appreciation by the Teacher-Parent Association