गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ आयोजित श्रावण मास मंगळागौर स्पर्धा 2025 हि मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये खिलाडी ग्रुप असगोली यांनी प्रथम क्रमांक पटकावले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारी समाजाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी भंडारी समाजाच्या महिला अध्यक्षा मानसी शेटे व इतर कमिटी सदस्य उपस्थित होते. Mangalagaur competition at Guhagar

या श्रावण मास मंगळागौर स्पर्धेत ७ ग्रुपने सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा गुहागर शहरातील भंडारी भवन किर्तनवाडी येथे पार पडली. यामध्ये प्रथम क्रमांक खिलाडी ग्रुप असगोली यांना ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक श्री वराती प्रासादिक भजन मंडळ खालचापाट द्वितीय यांना ३ हजार, स्वयंप्रकाश गोयथळे व मोरे खालचापाट यांना २ हजार रुपये, उत्तेजनार्थ स्वयंभू गजानन तवसाळ ग्रुप यांना १ हजार रुपये व भेटवस्तू देऊन देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर प्रत्येक सहभागी संघांना ५०० रुपये व प्रत्येकी भेटवस्तू देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण मनाली जाधव यांनी केले. यावेळी भंडारी समाज महिला उपाध्यक्ष सुचित्रा भोसले, भंडारी समाज सचिव नेहा वराडकर व तालुक्यातील महिलावर्गांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली होती. Mangalagaur competition at Guhagar
