गुहागर, ता. 05 महसूल सप्ताह निमित्ताने किर्तनवाडी आणि गुहागर परिसरातील शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा महसूल विभागातर्फे झाडे लावली. महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येत आहे. Tree plantation by Revenue Dept

या अंतर्गत दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी पाणंद/ शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे या कार्यक्रमाचे आयोजन गुहागर मंडळ स्तरावर करण्यात आले होते. किर्तनवाडी आणि गुहागर परिसरातील शिवरस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक, शेजारील शेतकरी तसेच कर्मचारी वर्गाकडून वृक्ष लागवड करण्यात आली, त्यांची देखभाल करण्याकरता संबंधित शेतकऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. Tree plantation by Revenue Dept
या कार्यक्रमासाठी निवासी नायब तहसीलदार वैशंपायन सर, गुहागर मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, ग्राम महसूल अधिकारी राधा आघाव, मनीष शिंदे, आनंद घागरे, अस्मिता तेरणी, महसूल सेवक अमित जोशी, पंकज आगरे, कल्पेश पवार, श्वेता निकम आणि सचिन भागडे सह स्थानिक शेतकरी उपस्थित होते. Tree plantation by Revenue Dept