संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहितेवाडी येथील प्रामाणिक पणे सेवा बजावणारे अनंत जानू पागडे (मुख्याध्यापक) यांचा शिक्षक सेवा पूर्ती गौरव सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप मोहिते यांचे अध्यक्षतेखाली नुकताच साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, पालक, शिक्षक व ज्ञानदिप सेवा मंडळ आणि आजी, माजी विद्यार्थी यांचे वतीने करण्यात आले होते. Service Completion Ceremony at Khodde

यावेळी सत्कार मुर्ती अनंत जानू पागडे यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील परिचय करुन देण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थ, पालक व ज्ञानदीप सेवा मंडळ, आजी, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक या सर्वांच्या वतीने अनंत जानू पागडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. Service Completion Ceremony at Khodde
यावेऴी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ मोहिते, अध्यक्ष दिनेश मोहिते, ज्ञानदीप सेवा मंडळाचे सेक्रेटरी यशवंत मोहिते, माजी मुख्याध्यापक अनंत गावडे, खोडदेचे ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. शुभांगी डिंगणकर, ग्रामपंचायत लिपीक नितीन मोहिते, मदतनीस वैभव निवाते, माजी सरपंच प्रदिप मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. श्रद्धा संजय मोहिते, वाडी प्रमुख काशिराम मोहिते, कृष्णाजी कावणकर, शंकर तांबे, अरुण मोहिते, विकास मोहिते, चंद्रकांत तांबे, शिक्षक संतोष भोसले, श्रीमती. रश्मी सुर्वे, पी.एच. मेश्राम, अंगणवाडी सेविका सौ. अक्षता अजित मोहिते मदतनीस सौ. तनिक्षा मोहिते यावेळी गावातील आजी-माजी विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. Service Completion Ceremony at Khodde

यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती अनंत जानू पागडे यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी 36 वर्ष केलेल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो. या उदात्त हेतूने शाळेमधील दोन विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेतून दत्तक घेतले आणि शाळेला भेटवस्तू दिल्या व ग्रामस्थांचे, पालकांचे आणि सहकारी शिक्षकांचे आभार मानले तसेच सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ गोविंद मोहिते यांनी एका विद्यार्थिनीच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. Service Completion Ceremony at Khodde