• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ तांबडवाडीत नागपंचमी साजरी

by Guhagar News
August 1, 2025
in Guhagar
129 2
0
Nagpanchami celebrated at Tavasal
254
SHARES
725
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत  नागपंचमी आनंदात साजरी करण्यात आली. कोकणात परंपरेचे सातत्य राखण्यासाठी महिलावर्ग नागदेवतेच्या पूजेत सामूहिक सहभाग घेतात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात येते. या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. Nagpanchami celebrated at Tavasal

Nagpanchami celebrated at Tavasal

नागपंचमी हा सापांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, ज्यांना भगवान शिवाशी जोडलेले मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी दूध अर्पण केल्याने आणि सापांची पूजा केल्याने वाईट शक्तींपासून लोकांचे रक्षण होते. हा दिवस हानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी आणि घरात यश आणि आनंदासाठी प्रार्थना करण्यासाठी देखील पाळला जातो. या दिवशी नागदेवतेला दूध, लाह्या, फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. Nagpanchami celebrated at Tavasal

कोकणात विशेषतः शेताच्या बांधावर उगवलेल्या घोमेटीच्या वेली मान दिला जातो. तेडसा, सोनवली, तीळाची फुले तसेच निसर्गात फुललेली विविध फुले वापरून पूजा केली जाते. अख्खा भात, लाह्या, साखर किंवा गूळ, काळे पांढरे तीळ वापरून नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे नागपंचमीचा उत्सव धार्मिक श्रद्धा आणि गोडवा जपत पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. Nagpanchami celebrated at Tavasal

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNagpanchami celebrated at TavasalNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.