गुहागर, ता. 31 : रिगल कॉलेज शृंगारतळीचा वार्षिक पावसाळी क्रीडा महोत्सव दि. २६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाला. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री अजित बेलवलकर (माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते, शृंगारतळी), मा.श्री. शावरी बंदीचोडे(क्रीडाशिक्षक, अंजनवेल हायस्कूल), मा.श्री.महेश तांबे (सदस्य, स्थानिक सल्लागार समिती, रिगल कॉलेज, शृंगारतळी) मा. श्री.संदेश बाबर (मालक, अधिराज फार्मसी, शृंगारतळी) उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री शावरी बंदीचोडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Sports Festival at Regal College Shringaratali

कार्यक्रमामध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीमधील हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख श्री वृणाल बेर्डे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल,श्री फळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. श्री बंदीचोडे यांनी खेळ हा आपल्या जीवनामधील महत्त्वाचा भाग आहे असे सांगत मुलांना शारीरिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला. श्री.बेलवलकर यांनी शृंगारतळी येथील शैक्षणिक गरज ओळखून रिगल कॉलेज सुरू केल्याबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजय शिर्के यांचे कौतुक केले. तसेच रिगल कॉलेजच्या तीन वर्षातील प्रगतीचा आलेख चढता असल्याचे सांगितले. मैदानी खेळाचे महत्त्व सांगताना नुसते पुस्तकी ज्ञान उपयोगी नसून खेळातून प्रगती करता येते असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करून कॉलेजचे नाव उंच करावे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या क्रीडामहोत्सवामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट या सांघिक खेळांचा तसेच वैयक्तिक खेळामध्ये १०० मीटर धावणे स्पर्धेचा समावेश होता. Sports Festival at Regal College Shringaratali

कबड्डी(मुले) प्रथम क्रमांक सामायिक संघ रिगल कॉलेज, कबड्डी(मुली) प्रथम क्रमांक तृतीय वर्ष(बीएससी हॉटेल मॅनेजमेंट), खो खो (मुली) प्रथम क्रमांक द्वितीय वर्ष(बीसीए), तसेच क्रिकेट(मुले) प्रथम क्रमांक तृतीय वर्ष(बीएससी हॉटेल मॅनेजमेंट) यांनी पटकाविला. वैयक्तिक स्पर्धा रनिंग(मुले)प्रथम क्रमांक कु.संचित पालशेतकर याने पटकाविला. या क्रीडा स्पर्धेचे नियोजन प्रा. विक्रम खैर तसेच प्रा.पूजा आरेकर यांनी केले. Sports Festival at Regal College Shringaratali
यावेळी रिगल कॉलेज,शृं गारतळीचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेजच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. Sports Festival at Regal College Shringaratali