रशियासह अमेरिका, जपानला त्सुनामीचा इशारा; हायअलर्ट जारी
मॉस्को – रशियाच्या कॅमचटका द्वीपकल्पाजवळ 8.7 तीव्रतेचा एक अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला आहे. भारतीय वेळेनुसार 30 जुलै पहाटे 4.54 वाजता आलेल्या या भूकंपाने संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची नोंद इतिहासातील आठव्या सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक म्हणून झाली आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप समुद्राखाली झाला. त्यानंतर आता त्सुनामीचा मोठा धोका आहे. रशियासह अमेरिका, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हायअलर्ट दिला गेला आहे. Earthquake at sea in Russia

थरकाप उडवणारी या भूकंपाची व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. भूकंपाचे केंद्र समुद्रात असल्याने धोका हा अधिकच वाढल्याचे दिसत आहे. या भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने म्हटले आहे की, 1 मीटर उंचीच्या लाटा जपानच्या किनारपट्टीच्या भागात येऊ शकतात. जपानचे पंतप्रधान यांना या भूकंपाची संपूर्ण माहिती देण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर ते स्वत: नजर ठेऊन आहेत. हेच नाही तर सरकारकडून लगेचच आपत्कालीन बैठकही बोलावली. ज्यामध्ये मदत आणि बचाव कार्यांवर चर्चा करण्यात आली. Earthquake at sea in Russia

कोणत्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू केलीये. रशियामध्ये पहिल्यांदा भूकंप आला, असे अजिबातच नाहीये. यापूर्वीही अनेकदा भूकंप येऊन गेलाय. या वर्षी 20 जुलै रोजी कॅमचटकामध्येही तीव्र भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 होती. अमेरिकेकडूनही त्सुनामीचा इशारा अनेक भागात देण्यात आला आहे. पुढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागात धोकादायक त्सुनामी लाटा धडकू शकतात, असे म्हटले आहे. पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जातंय लोकांनाही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, या भूकंपाचे केंद्र कॅमचटकाच्या पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापासून सुमारे 136 किलोमीटर अंतरावर, पेट्रोपावलोव्स्क-कॅमचत्स्कीच्या आग्नेयेला होते. भूकंपाची खोली 18.2 किलोमीटर इतकी होती, ज्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवली. Earthquake at sea in Russia