नवीदिल्ली, ता. 22 : जगदीप धनखड यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी दोन नावे शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव चर्चेत आहे. Resignation of the Vice President

आपल्या प्रकृतीचे कारण देत जगदीश धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिला. संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीश धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोण विराजमान होईल याची चर्चा सुरु झाली आहे. उपराष्ट्रपती निवडण्यासाठी भाजपकडे यंत्रणा आहे. पक्षातील अनुभवी नेता, केंद्रीय मंत्री किंवा राज्यपालांपैकी एकाची या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती होण्याआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यसभा सभापतींच्या खूर्चीवर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु आहे. Resignation of the Vice President

धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. धनखड यांचा राजीनामा स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आता त्या परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती नेमके कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Resignation of the Vice President