गुहागरातील शासनाच्या विविध योजनांच्या कामाचा घेतला आढावा
गुहागर, ता. 19 : केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी गुहागर दौरा केला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेवर अधिक भर दिला. गुहागर तालुक्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या 1266 घरकुलांपैकी केवळ 378 घरकुलाची कामे सुरू आहेत. मात्र मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 109 लाभार्थ्यांना सहहिसीदारांची सहमती नसल्याने ती रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु 25 जुलै च्या आत किरकोळ त्रुटी दूर करून पूर्णत्वास जाणारी घरकुले तातडीने पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना त्यांनी गुहागरच्या प्रशासनाला दिल्या आहेत. Review of various government schemes in Guhagar
कोतळूक येथील काजू प्रोसेसिंग युनिट, पापड उद्योग, काळसुर कौंढर येथील गांडूळ खत प्रकल्प यांची पाहणी करण्याबरोबर ग्रामपंचायत वरवेली, येथील शाळा व सौर ऊर्जा प्रकल्पालाही भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच वरवेली येथील सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत शासकीय जागेची या प्रकल्पासाठी एप्रिल अखेर मान्यता मिळवली असून जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. यामुळे जाग्यवर पॅनल आले असून पाऊस विश्रांतीनंतर काम सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजना याचा आढावा घेताना प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर कामे प्रगतीपथावरची कामे त्याचबरोबर त्यांना कितवा हप्ता दिला या सर्वांची माहिती घेतली. Review of various government schemes in Guhagar

या योजनेची माहिती घेत असताना काही नोडल अधिकाऱ्यांना आपलं नक्की काम कोणतं याची जाणीव नसल्याचे समोर आले. कागदपत्र अपूर्ण असताना लाभार्थ्यांना मंजुरी कशी दिली. असाही सवाल केला गेला यामुळे सदर कामांना गती मिळण्यासाठी सर्वाधिक लक्ष देत सुरू असलेल्या कामांमध्ये 714 कामांना दुसरा हप्ता प्रलंबित असल्याचे समोर आले 671 कामे अजूनही बांधकामाला सुरुवात नाही तर 378 कामे सुरू असल्याचा आढाव्यातून पुढे आले आहे. Review of various government schemes in Guhagar
रमाई आवास योजनेतून 328 पैकी 46 कामे अद्याप अपूर्ण आहेत. या योजनेमध्ये ज्यांची जागाच नाही त्याला लाभार्थ्यांना मंजुरी कशी दिली असाही सवाल उठविला. मोदी आवास योजनेतील 512 मंजूर कामांपैकी 270 कामे अजून अपूर्ण आहेत. तर 207 कामे सेंटर लेवलला तर 21 कामे प्लिज लेवलला झाली असल्याचे यावेळी आढाव्यातून समोर आले. ज्यामध्ये जातीचा दाखला नाही त्यांनाही या योजना मंजूर कशी झाली असेही यावेळी सवाल करण्यात आला. Review of various government schemes in Guhagar

तालुक्यातील जलजीवन योजनेचा आढावा घेताना तालुक्यातील 112 योजना असून यातील 26 योजनांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. अजून दहा योजना अद्याप सुरू झालेल्या नसून 46 योजनांचे रिवाईज अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप निधी न आल्याने काही ठिकाणची कामे थांबली आहेत असे सांगत केंद्र स्तरावर निधी आल्यावर या कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ही गुहागर तालुक्याचे चांगले काम असल्याचे त्यांनी बोलताना मत व्यक्त केले. Review of various government schemes in Guhagar
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, जिल्हा कृषी अधिकारी अभिजीत गडदे, गटविकास अधिकारी शेखर भिलारे पंचायत समितीतील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसेवक उपस्थित होते. Review of various government schemes in Guhagar
ग्रामस्थांना दूर ठेवण्याचे नियोजनात्मक अंमलबजावणी
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्यामध्ये कोणत्याही प्रकल्पाला अथवा ग्रामपंचायतीला भेट देत असताना त्या ठिकाणी गावातील ग्रामस्थ येणार नाहीत याचे नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली होती. यामुळे केवळ प्रशासकीय कर्मचारी व अधिकारीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटू शकतात. ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार किंवा स्वतःचे म्हणणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत देऊ नये यासाठी गुहागरच्या पंचायत समितीच्या प्रशासनाने खबरदारी घेतली होती. Review of various government schemes in Guhagar