गुहागर, ता. 19 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन शिंपी समाज मंडळ, गुहागर यांचे तर्फे मंगळवार दि. २२ जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या पर्शुराम सभागृहामध्ये करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. Samadhi ceremony of Sant Shiromani Namdev Maharaj

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ, गुहागर यांचे तर्फे दि. २२ जुलै रोजी सकाळी 8 ते 10 संत नामदेव महाराजांची पूजा, श्री सत्यनारायणाची पूजा, सकाळी ११ ते १२ गौरव सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. प्रविण विश्वनाथ वेल्हाळ माजी सरपंच नरवण व श्री. शार्दुल सुधन्वा भावे अध्यक्ष – श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 ते 1.15 ह.भ.प.सौ. मनाली मनोज बावधनकर यांचे कीर्तन. संध्याकाळी 5 ते 7 हळदीकुंकू समारंभ व स्वरसाधना महिला भजन मंडळ सौ. आदिती गणेश धनावडे यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे. Samadhi ceremony of Sant Shiromani Namdev Maharaj

तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळाने केले आहे. Samadhi ceremony of Sant Shiromani Namdev Maharaj